10 वी 12 वी breaking news
Lockdown | दहावी, बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांना संचारबंदीत शिथिलता दहावी - बारावीचे राज्य मंडळाचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी शिक्षकांना उत्तर पत्रिकांची ने आण करता येणे शक्य व्हावे यासाठी त्यांना संचारबंदीतून सूट देणे आवश्यक होते. त्या प्रकारची मागणी सुद्धा शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे केली होती मुंबई : मार्च महिन्यात 10 वी आणि 12 वी परीक्षा झाल्यानंतर लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक शिक्षकांच्या दहावी - बारावीच्या अनेक उत्तरपत्रिका तपासणीविना शाळेत तर काही शिक्षकांकडे अडकून पडल्यात. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी झाल्याशिवाय बोर्डाचा निकाल जाहीर होणे शक्य नाही. शिवाय निकाल लागल्याशिवाय पुढील वर्षातील प्रवेश प्रक्रियाही पार पडू शकणार नाही. त्यामुळे दहावी - बारावीचे राज्य मंडळाचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी शिक्षकांना उत्तर पत्रिकांची ने आण करता येणे शक्य व्हावे यासाठी त्यांना संचारबंदीतून सूट देणे आवश्यक होते. त्या प्रकारची मागणी सुद्धा शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचि...