लॉकडाऊनमुळे दाणादाण! ४० टक्के पर्यटन कंपन्या बंद होणार पर्यटन व्यवसायाची करोनामुळे तसेच त्याचा संसर्ग कमी करण्यासाठी जगभरात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे दाणादाण उडाली असून, येत्या तीन ते सहा महिन्यांत सुमारे ४० टक्के पर्यटन कंपन्या कायमच्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. वृत्तसंस्था, नवी दिल्ली पर्यटन व्यवसायाची करोनामुळे तसेच त्याचा संसर्ग कमी करण्यासाठी जगभरात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे दाणादाण उडाली असून, येत्या तीन ते सहा महिन्यांत सुमारे ४० टक्के पर्यटन कंपन्या कायमच्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. बोट या ट्रॅव्हल सेंटिमेंट ट्रॅकर संस्थेने विविध सात राष्ट्रीय पर्यटन व्यवसाय संघटनांसमवेत यासंदर्भात एक संशोघन केले. त्याचा अहवाल सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये पर्यटन उद्योगाची दयनीय स्थिती मांडण्यात आली आहे. बोट ट्रॅव्हल टॅकरने देशातील २,३०० ट्रॅव्हल कंपन्यांना व्यवसायाच्या सद्यस्थितीबाबत प्रश्न विचारले होते. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे, या उद्योगक्षेत्रातील ३६ टक्के कंपन्या आपला व्यवसाय काही काळासाठी बंद करण्याची शक्यता या अहवालात वर्तवली गेल...
Posts
Showing posts from May 25, 2020
लॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत
- Get link
- X
- Other Apps
लॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत सततच्या लॉकडाउनवाढीमुळे आर्थिक तसेच मानसिक व शारीरिक आरोग्यविषयक गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचे आनंद महिंद्र यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. सध्या देशात चौथे लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनला वेळोवेळी देण्यात येत असलेली मुदतवाढ ही अत्यंत घातक असल्याचे स्पष्ट मत, महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी सोमवारी व्यक्त केले. सततच्या लॉकडाउनवाढीमुळे आर्थिक तसेच मानसिक व शारीरिक आरोग्यविषयक गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. लॉकडाउनवाढी ही आर्थिकदृष्ट्या घातक असल्याचे आपण यापूर्वी ट्विट केले होते असे सांगत महिंद्र यांनी लॉकडाउनवाढीमुळे आणखी एक आरोग्यविषयक समस्या निर्माण होणार आहे, असे म्हटले आहे. कोविड-१९ किंवा करोनाबाधितांकडे लक्ष देतानाच या विषाणूची लागण न झालेल्या लोकांकडे आपले पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे, ज्यामुळे या लोकांमध्ये मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत, याकडेही आनंद महिंद्र यांनी लक्ष वेधले आहे. महिंद्र यांनी यापूर्वीच ४९ दिवसांन...
मजुरांच्या स्थलांतरामुळे भारतासमोर उभं राहणार हे संकेट, UNने दिला इशारा
- Get link
- X
- Other Apps
मजुरांच्या स्थलांतरामुळे भारतासमोर उभं राहणार हे संकेट, UNने दिला इशारा नवी दिल्ली 25 मे : कोरोनामुळे सर्व जगावरच संकट ओढवलं आहे. यात जगातले जवळपास सगळेच देश भरडून निघत आहेत. प्रत्येक देशांचे प्रश्न हे वेगळे आहेत. कोरोनामुळे जे देशांतर्गत विस्थापन झालं त्यामुळे भारतासमोर नवीनच संकट निर्माण होणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात देण्यात आला आहे. विस्थापनामागे अनेक कारणं असली तरी यावेळचं कारण हे खूपच वेगळं आहे. अतिशय संवेदनशीलतेनं हा प्रश्न हाताळावा लागेल. तरच कोट्यवधी लोकांचे संसार पुन्हा उभे राहतील नाहीतर देशासमोर एक वेगळीच समस्या निर्माण होईल असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील भीषण चक्रीवादळ 'अम्फान' मुळे मोठ्या संख्येने लोक विस्थापित झाल्याचा घटना पुढे असताना गेल्या वर्ष २०१९ मध्ये देशातील नैसर्गिक आपत्ती, संघर्ष आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे जवळपास ५० लाख लोकांचे विस्थापन झाल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्राने जारी केला आहे. दरवर्षी लाखो लोक विविध कारणामुळे विस्थापित होत असतात. विस्थापनामागे अनेक कारण असत...