कोरोनाची लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची गोळ्या झाडून हत्या
कोरोनाची लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची गोळ्या झाडून हत्या कोरोनाची लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पिट्सबर्ग : कोरोनाची लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अमेरिकेच्याा पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये बिंग लू हे शास्त्रज्ञ रिसर्च असिस्टन्ट प्रोफेसर होते. बिंग लू यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळ आढळला. गोळ्या झाडल्यामुळे बिंग लू यांच्या डोक्यावर, गळ्यावर, धडावर आणि हाता-पायांना जखमा झाल्या होत्या, अशी माहिती रॉस पोलीस विभागाने दिली. बिंग लू यांची हत्या करणाऱ्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. बिंग लू यांची हत्या केल्यानंतर या व्यक्तीने लू यांच्या घराबाहेर असलेल्या स्वत:च्याच कारमध्ये आत्महत्या केली, असा पोलिसांचा अंदाज आहे. या दोन्ही व्यक्ती एकमेकांना ओळखत होत्या, असाही पोलिसांना संशय आहे. चीनचे नागरिक असल्यामुळे बिंग लू यांची हत्या झाल्याची शक्यता तपास यंत्रणांनी फेटाळून लावली आहे. कोरोनावर लस तयार केल्याचा या देशाचा दावा बिंग लू यांच्या मृत्यूमुळे आम्ही दु...