सातारा जिल्ह्यात दिवसभरात २८ नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १६६ वर
सातारा जिल्ह्यात दिवसभरात २८ नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १६६ वर सातारा जिल्ह्यातील जावळी, खंडाळा, खटाव, पाटण, कराड आणि सातारा या तालुक्यातील प्रवास करून आलेले आणि काही बाधितांचे निकट सहवासीत असे एकूण २० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी बनपुरी येथील क्वारंटाईन मध्ये अचानक मृत्यू पावलेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. आज सकाळी जिल्ह्यात ८ कोरोनाबाधित सापडले होते. त्यानंतर आता २० रुग्ण सापडल्याने आज दिवसभरात एकूण तब्बल २८ नवीन कोरोना रुग्णांची भर पडल्याने सातारा जिल्ह्याची चिंता वाढली आहे. पाटण तालुक्यातील बनपुरी येथे क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा अचानक मुत्यू झाला होता. काही दिवसापुर्वी ती महिला मुंबई येथून आली होती. आता त्या महिलेचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. नवीन सापडलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश जण हे पुण्या मुंबईहून प्रवास करून आलेले किंवा त्यांचे निकटवर्तीय आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रश...