देशात कोरोना रिकव्हरी रेट 30 टक्क्यांजवळ, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
देशात कोरोना रिकव्हरी रेट 30 टक्क्यांजवळ, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही दिलासादायक बाब अशी की, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. नवी दिल्ली, 9 मे: देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, दुसरीकडे देशात कोरोना विषाणूचा रिकव्हरी दरात वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 30 टक्क्यांजवळ पोहोचले आहे. दिलासादायक बाब अशी की, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3320 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59,662 झाली असून लवकरच ती 60 हजारांचा टप्पा पार करणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 95 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा 1981 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 17,847 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, देशातील प्रत्येक नागरिकाला लॉकडाऊ...