Posts

Showing posts from May 10, 2020
Image
अरे देवा! भविष्यात आणखी एक संकट, पुन्हा घरात व्हावं लागणार बंदिस्त कोरोनाव्हायरसचा नाश होऊन आपण कधी घराबाहेर पडतो, याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. मात्र भविष्यात आणखी एक संकट उभं ठाकलंय. नवी दिल्ली, 09 मे :  कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) जगभरातील  लोकांना घरात कैद व्हावं लागलं आहे. हा लॉकडाऊन (lockdown) संपून आपण कधी घराबाहेर पडतो असं प्रत्येकाला झालं आहे. मात्र काही वर्षांनी आणखी एक संकट येणार आहे, ज्यामुळे असंच पुन्हा घरात बंदिस्त व्हावं लागणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, 2060 साली आपल्याला पुन्हा घरात कैद व्हावं लागणार आणि याला कारण कोणता आजार नाही तर भीषण उष्णता (Extreme Heat) असणार आहे. गेल्या काही दशकांत उष्णतेत वाढ होते आहे.  सायन्स अॅडव्हान्स जर्नल मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, 1979 पासून भारत, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, चीन, अमेरिकेत तापमानाचा पारा आणि आर्द्रता वाढण्याच्या अनेक घटना घटल्यात. आतापर्यंत ही समस्या केवळ एक ते दोन तासांपर्यंत मर्यादित होती. मात्र ज्या पद्धतीनं हवामानात बदल होतं आहेत, त्यानुसार ही समस्या जास्त कालाव...