सुरक्षेची हमी देण्यासाठी ‘सलून’वाल्याने केली भन्नाट आयडिया, पाहून तुम्ही पडाल चाट!
सुरक्षेची हमी देण्यासाठी ‘सलून’वाल्याने केली भन्नाट आयडिया, पाहून तुम्ही पडाल चाट! सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी हटके प्रयोग सांगलीच्या सलून ने केला आहे. सांगली 09 मे: लॉकडाऊनमुळे सगळेच व्यवहार बंद आहेत. आता काही अटींवर स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवे बरोबरच इतरही काही जणांना दुकाने खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याने ग्राहक दुकानांमध्ये फारसे फिरकताना दिसत नाहीत. त्यावर तोडगा म्हणून आणि ग्राहकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी सांगितल्या एका सलूनवाल्याने एक भन्नाट आयडिया केलाय. त्याने आपल्या दुकानातल्या सगळ्या मुलांना पीपीई किट दिली आहे. आता ते सर्व जण ही किट घालूनच केस कापत आहेत. सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी हटके प्रयोग सांगलीच्या सलून ने केला आहे. PPE किट घालून सलून मध्ये केस कटिंग सुरू केले आहे. या सलून चालकाची चांगलीच चर्चा सांगलीत रंगली आहे. सांगलीच्या सावरकर कॉलनीमध्ये किरण जाधव यांचे रविज सलून आहे. ते गेल्या सहा वर्षांपासून या ...