देशात कोरोना रिकव्हरी रेट 30 टक्क्यांजवळ, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

देशात कोरोना रिकव्हरी रेट 30 टक्क्यांजवळ, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

दिलासादायक बाब अशी की, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.

देशात कोरोना रिकव्हरी रेट 30 टक्क्यांजवळ, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

नवी दिल्ली, 9 मे: देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, दुसरीकडे देशात कोरोना विषाणूचा रिकव्हरी दरात वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 30 टक्क्यांजवळ पोहोचले आहे. दिलासादायक बाब अशी की, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3320 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59,662 झाली असून लवकरच ती 60 हजारांचा टप्पा पार करणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 95 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा 1981 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 17,847 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, देशातील प्रत्येक नागरिकाला लॉकडाऊनच्या नियमाचं काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे  पालन करावे लागणार आहे. त्यानंतरच देशात घुसलेल्या कोरोनाला हद्दपार करता येईल.
देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ असली तरी प्रत्येक तीन रुग्णांमध्ये एक रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी जात आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर 29.91 टक्के आहे तर मृतांचा दर 3.2 टक्के आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात मृतांचा दर सुदैवाने खूप कमी आहे. मात्र, तरी देखील काळजी घेणे महत्त्वाचं असल्याचं लव अग्रवाल यांनी सांगितलं.
मागील सात दिवसांचा रिकव्हरी रेट...
9 मे : 29.91%
8  मे : 29.35%
7 मे : 28.83%
6 मे: 28.71%
5 मे: 28.17%
4 मे: 27.45%
3 मे: 26.59%
देशभरात तिसऱ्या लॉकडाऊनमध्येही कोरोना रुग्णसंख्या वाढीचा आलेख वाढतोच आहे. महाराष्ट्रातला आकडा सर्वात वेगाने वाढतो आहे. त्यातही सर्वाधिक कोरोनाग्रस्त महानगरी मुंबईत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा दावा आहे की, राज्यात कोरोना चाचण्यांचं प्रमाण सर्वात जास्त असल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडादेखील वाढतो आहे. पण आता या दाव्याला छेद देत तामिळनाडूने चाचण्यांच्या संख्येत वाढ केली आहे.महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांपेक्षा तामिळनाडूत अधिक चाचण्या झाल्या आहेत. तरी या राज्यात कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रापेक्षा बरेच कमी आहेत.

Comments

Popular posts from this blog

CORONA SYMTOMS

नालासोपाऱ्यात भाजी व्यापाऱ्याच्या घरावर जमावाचा हल्ला

लॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत