रतन टाटांनी खरेदी केली मुंबईच्या 18 वर्षीय तरुणाच्या फार्मसीमध्ये 50% भागीदारी


रतन टाटांनी खरेदी केली मुंबईच्या 18 वर्षीय तरुणाच्या फार्मसीमध्ये 50% भागीदारी

रतन टाटा यांनी मुंबईच्या 18 वर्षीय अर्जुन देशपांडे या तरुणाच्या 'जेनरिक आधार' या फार्मसीमध्ये 50 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. ही कंपनी किरकोळ दुकानदारांना बाजारभावापेक्षा कमी दराने औषधविक्री करते.

मुंबई, 07 मे : टाटा ग्रृपचे चेअरमन रतन टाटा यांनी मुंबईतील एका 18 वर्षीय तरुणाच्या 'जेनरिक आधार' या फार्मसीमध्ये 50 टक्के भागीदारी खदेदी केली आहे. या कंपनीच्या तरूण फाऊंडरचे नाव अर्जुन देशपांडे असून त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे दोन वर्षांपूर्वी ही कंपनी सुरू केली होती. अन्य ऑनलाइन फार्मसी कंपन्यांच्या मानाने जेनरिक आधारमध्ये औषधे स्वस्त दरामध्ये विकली जातात. देशपांडेने या डीलबाबत माहिती दिली मात्र या कराराच्या किंमतीबाबत माहिती मिळालेली नाही. 3 ते 4 महिन्यांपूर्वी त्याने टाटांना याबद्दल सांगितले होते. रतन टाटांनी अर्जुनच्या कल्पनेमध्ये उत्सुकता दाखवली आणि त्यांना देखील त्याचा मेंटर बनून काम करावेसे वाटले. अर्जुनने दिलेल्या माहितीनुसार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.

मुंबईच्या या तरूणाने दोन वर्षांपूर्वी जेनरिक आधारची सुरूवात केली होती. आता कंपनीकडून वार्षिक 6 कोटींची विक्री होते. अर्जुन देशपांडेने त्याची कंपनी सुरू करताना यूनीक फार्मेसी एग्रीगेटर बिजनेस मॉडेल स्वीकारले आहे. यामध्ये थेट मॅन्युफॅक्चरर्सकडून औषधांची खरेदी करून त्याची विक्री किरकोळ दुकानदारांना केली जाते. यामुळे मधे असणाऱ्या होलसेलर्सचा 15 ते 20 टक्के मार्जिन वाचतो. या तरुणाती कंपनी सध्या भारतातील इतर शहरामध्ये विस्तारत आहे. टाटांच्या भागीदारीमुळे कंपनीच्या विस्तारासाठी मोठा फायदा होणार आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरु आणि ओडिशामधील जवळपास 30 रिटेलर्स या कंपनीशी जोडले गेले आहेत. या कंपनीमध्ये एकूण 55 कर्मचारी असून त्यामध्ये फार्मासिस्ट,आयटी इंजीनिअर आणि मार्केटिंग प्रोफेशनल्स आहेत.

संपादन- जान्हवी भाटकर

News18 lokmat

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

CORONA SYMTOMS

नालासोपाऱ्यात भाजी व्यापाऱ्याच्या घरावर जमावाचा हल्ला

लॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत