काश्मिरात धुमश्चक्री; लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह तीन जवान शहीद

काश्मिरात धुमश्चक्री; लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह तीन जवान शहीद



कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती.



भारत-पाकिस्तान सीमेवर शनिवारी रात्री पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी सुरक्षा रक्षकांची जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती. एएआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

Comments

Popular posts from this blog

CORONA SYMTOMS

नालासोपाऱ्यात भाजी व्यापाऱ्याच्या घरावर जमावाचा हल्ला

लॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत