Popular posts from this blog
नालासोपाऱ्यात भाजी व्यापाऱ्याच्या घरावर जमावाचा हल्ला
नालासोपाऱ्यात भाजी व्यापाऱ्याच्या घरावर जमावाचा हल्ला स्थलांतरितांना गावी जाण्यासाठी भरावा लागणारा ऑनलाइन फॉर्म भरून न दिल्याच्या कारणावरून नालासोपाऱ्यात एका भाजी व्यापाऱ्याच्या घरावर जमावानं दगड, विटांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ३० ते ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे : गावी जाण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरून न दिल्याच्या कारणावरून नालासोपाऱ्यातील एका भाजी व्यापाऱ्याच्या घरावर जमावानं हल्ला केला आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. लोखंडी रॉड, दगड आणि विटा घेऊन जमावानं व्यापाऱ्याच्या घराला लक्ष्य केलं. या हल्ल्यात सहा वर्षांच्या मुलासह दोघे जखमी झाले आहेत. वसई गाव पोलिसांनी या प्रकरणी ३० ते ३२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात नालासोपारा पश्चिमेकडच्या कळम गावातील काही लोक आहेत. हल्लेखोरांपैकी १२ जणांची ओळख पटली आहे. तर, इतरांचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 'रेल्वेनं अद्याप स्थलांतरितांना कुठलीही सवलत दिलेली नाही' ब्रिजेश चौहान (३०) असं हल्ला झालेल्या भाजी व्यापाऱ्याचं नाव आहे. तो नालासोपारा प...
लॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत
लॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत सततच्या लॉकडाउनवाढीमुळे आर्थिक तसेच मानसिक व शारीरिक आरोग्यविषयक गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचे आनंद महिंद्र यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. सध्या देशात चौथे लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनला वेळोवेळी देण्यात येत असलेली मुदतवाढ ही अत्यंत घातक असल्याचे स्पष्ट मत, महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी सोमवारी व्यक्त केले. सततच्या लॉकडाउनवाढीमुळे आर्थिक तसेच मानसिक व शारीरिक आरोग्यविषयक गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. लॉकडाउनवाढी ही आर्थिकदृष्ट्या घातक असल्याचे आपण यापूर्वी ट्विट केले होते असे सांगत महिंद्र यांनी लॉकडाउनवाढीमुळे आणखी एक आरोग्यविषयक समस्या निर्माण होणार आहे, असे म्हटले आहे. कोविड-१९ किंवा करोनाबाधितांकडे लक्ष देतानाच या विषाणूची लागण न झालेल्या लोकांकडे आपले पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे, ज्यामुळे या लोकांमध्ये मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत, याकडेही आनंद महिंद्र यांनी लक्ष वेधले आहे. महिंद्र यांनी यापूर्वीच ४९ दिवसांन...
🙄
ReplyDelete