Skip to main content

लॉकडाऊनदरम्यान लवकरच Zomato कडून घरपोच दारुची डिलिव्हरी ??


लॉकडाऊनदरम्यान लवकरच Zomato कडून घरपोच दारुची डिलिव्हरी ??

Kya hai such ..!!!!

दारु पिणाऱ्यांसाठी आता दारुच्या दुकांनाबाहेर मोठी रांग लावण्याची गरज पडणार (Zomato alcohol delivery during lockdown) नाही ???








मुंबई : दारु पिणाऱ्यांसाठी आता दारुच्या दुकांनाबाहेर मोठी रांग लावण्याची गरज पडणार (Zomato alcohol delivery during lockdown) नाही. कारण लवकरच फूड डिलिव्हर कंपनी झोमॅटो घरोघरी दारु पोच करणार आहे, असा निर्णय झोमॅटोने घेतला आहे. लॉकडाऊनदरम्यान दारुची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे झोमॅटोने दारुची डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटलं (Zomato alcohol delivery during lockdown) आहे.
लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशात दारुची दुकानं बंद करण्यात आली होती. जवळपास 40 दिवसांनंतर 4 मे रोजी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील अनेक भागात दारुची दुकानं सुरु करण्यात आली आहेत. दुकानं सुरु करताच दुकानाबाहेर दारुप्रेमींनी मोठ्या रांगा लावल्या. यावेळी दारुप्रेमींनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडले. त्यामुळे दारुची दुकानं उघडल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
लॉकडाऊनमुळे दारुच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या संधीचा फायदा घेत दारुवर 70 टक्के विशेष कोरोना टॅक्स लावला आहे. आता झोमॅटोही या संधीचा फायदा घेत आहे.
सध्या भारतात दारुची होम डिलिव्हरी करण्यासाठी कोणताही कायदा नाही. वेगवेगळ्या राज्यात दारु पिण्यासाठीवेगळा कायदा आहे. पण घरपोच दारु संबंधित राज्य सरकारने कायदा करावा, असं मत उद्योग संघटना इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसीएशन ऑफ इंडिया (ISWAI) च्या संबंधित सदस्यांनी मांडले आहे.
“सरकारने राज्याला घरोघरी दारु पोच करण्यास परवानगी द्यावी. जेणेकरुन लॉकडाऊनमध्ये राज्यातील महसूल वाढेल”, असं मत ISWAI चे कार्यकारी अध्यक्ष अमृत सिंह यांनी व्यक्त केले.
“जर टेक्नॉलॉजीच्या मदतीने दारुची डिलिव्हरी केली जाऊ शकते. तर दारु विक्री चांगल्या प्रकारे होऊ शकते. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी आहेत अशा ठिकाणी आम्ही दारु घरपोच देण्याचा विचार करत आहे”, असं झोमॅटोचे सीईओ मोहित गुप्ता यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

CORONA SYMTOMS

नालासोपाऱ्यात भाजी व्यापाऱ्याच्या घरावर जमावाचा हल्ला

लॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत