Posts

Image
लॉकडाऊनमुळे दाणादाण! ४० टक्के पर्यटन कंपन्या बंद होणार पर्यटन व्यवसायाची करोनामुळे तसेच त्याचा संसर्ग कमी करण्यासाठी जगभरात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे दाणादाण उडाली असून, येत्या तीन ते सहा महिन्यांत सुमारे ४० टक्के पर्यटन कंपन्या कायमच्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. वृत्तसंस्था, नवी दिल्ली पर्यटन व्यवसायाची करोनामुळे तसेच त्याचा संसर्ग कमी करण्यासाठी जगभरात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे दाणादाण उडाली असून, येत्या तीन ते सहा महिन्यांत सुमारे ४० टक्के  पर्यटन कंपन्या  कायमच्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. बोट या ट्रॅव्हल सेंटिमेंट ट्रॅकर संस्थेने विविध सात राष्ट्रीय पर्यटन व्यवसाय संघटनांसमवेत यासंदर्भात एक संशोघन केले. त्याचा अहवाल सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये पर्यटन उद्योगाची दयनीय स्थिती मांडण्यात आली आहे. बोट ट्रॅव्हल टॅकरने देशातील २,३०० ट्रॅव्हल कंपन्यांना व्यवसायाच्या सद्यस्थितीबाबत प्रश्न विचारले होते. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे, या उद्योगक्षेत्रातील ३६ टक्के कंपन्या आपला व्यवसाय काही काळासाठी बंद करण्याची शक्यता या अहवालात वर्तवली गेल...

लॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत

Image
लॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत सततच्या लॉकडाउनवाढीमुळे आर्थिक तसेच मानसिक व शारीरिक आरोग्यविषयक गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचे आनंद महिंद्र यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. सध्या देशात चौथे लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनला वेळोवेळी देण्यात येत असलेली मुदतवाढ ही अत्यंत घातक असल्याचे स्पष्ट मत, महिंद्र समूहाचे अध्यक्ष  आनंद महिंद्र  यांनी सोमवारी व्यक्त केले. सततच्या लॉकडाउनवाढीमुळे आर्थिक तसेच मानसिक व शारीरिक आरोग्यविषयक गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. लॉकडाउनवाढी ही आर्थिकदृष्ट्या घातक असल्याचे आपण यापूर्वी ट्विट केले होते असे सांगत महिंद्र यांनी लॉकडाउनवाढीमुळे आणखी एक आरोग्यविषयक समस्या निर्माण होणार आहे, असे म्हटले आहे. कोविड-१९ किंवा करोनाबाधितांकडे लक्ष देतानाच या विषाणूची लागण न झालेल्या लोकांकडे आपले पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे, ज्यामुळे या लोकांमध्ये मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत, याकडेही आनंद महिंद्र यांनी लक्ष वेधले आहे. महिंद्र यांनी यापूर्वीच ४९ दिवसांन...

मजुरांच्या स्थलांतरामुळे भारतासमोर उभं राहणार हे संकेट, UNने दिला इशारा

Image
मजुरांच्या स्थलांतरामुळे भारतासमोर उभं राहणार हे संकेट, UNने दिला इशारा नवी दिल्ली 25 मे :  कोरोनामुळे सर्व जगावरच संकट ओढवलं आहे.  यात जगातले जवळपास सगळेच देश भरडून निघत आहेत. प्रत्येक देशांचे प्रश्न हे वेगळे आहेत. कोरोनामुळे जे देशांतर्गत विस्थापन झालं त्यामुळे भारतासमोर नवीनच संकट निर्माण होणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात देण्यात आला आहे. विस्थापनामागे अनेक कारणं असली तरी यावेळचं कारण हे खूपच वेगळं आहे. अतिशय संवेदनशीलतेनं हा प्रश्न हाताळावा लागेल. तरच कोट्यवधी लोकांचे संसार पुन्हा उभे राहतील नाहीतर देशासमोर एक वेगळीच समस्या निर्माण होईल असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील भीषण चक्रीवादळ 'अम्फान' मुळे मोठ्या संख्येने लोक विस्थापित झाल्याचा घटना पुढे असताना गेल्या वर्ष २०१९ मध्ये देशातील नैसर्गिक आपत्ती, संघर्ष आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे जवळपास ५० लाख लोकांचे विस्थापन झाल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्राने जारी केला आहे. दरवर्षी लाखो लोक विविध कारणामुळे विस्थापित होत असतात. विस्थापनामागे अनेक कारण असत...

सातारा जिल्ह्यात दिवसभरात २८ नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १६६ वर

Image
सातारा जिल्ह्यात दिवसभरात २८ नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १६६ वर सातारा जिल्ह्यातील जावळी, खंडाळा, खटाव, पाटण, कराड आणि सातारा या तालुक्यातील प्रवास करून आलेले आणि काही बाधितांचे निकट सहवासीत असे एकूण २० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी बनपुरी येथील क्वारंटाईन मध्ये अचानक मृत्यू पावलेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. आज सकाळी जिल्ह्यात ८ कोरोनाबाधित सापडले होते. त्यानंतर आता २० रुग्ण सापडल्याने आज दिवसभरात एकूण तब्बल २८ नवीन कोरोना रुग्णांची भर पडल्याने सातारा जिल्ह्याची चिंता वाढली आहे. पाटण तालुक्यातील बनपुरी येथे क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा अचानक मुत्यू झाला होता. काही दिवसापुर्वी ती महिला मुंबई येथून आली होती. आता त्या महिलेचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. नवीन सापडलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश जण हे पुण्या मुंबईहून प्रवास करून आलेले किंवा त्यांचे निकटवर्तीय आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रश...

सुरक्षेची हमी देण्यासाठी ‘सलून’वाल्याने केली भन्नाट आयडिया, पाहून तुम्ही पडाल चाट!

Image
सुरक्षेची हमी देण्यासाठी ‘सलून’वाल्याने केली भन्नाट आयडिया, पाहून तुम्ही पडाल चाट! सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी हटके प्रयोग सांगलीच्या सलून ने केला आहे. सांगली 09 मे:  लॉकडाऊनमुळे सगळेच व्यवहार बंद आहेत. आता काही अटींवर स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवे बरोबरच इतरही काही जणांना दुकाने खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याने ग्राहक दुकानांमध्ये फारसे फिरकताना दिसत नाहीत. त्यावर तोडगा म्हणून आणि ग्राहकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी सांगितल्या एका सलूनवाल्याने एक भन्नाट आयडिया केलाय. त्याने आपल्या दुकानातल्या सगळ्या मुलांना पीपीई किट दिली आहे. आता ते सर्व जण ही किट घालूनच केस कापत आहेत. सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी हटके प्रयोग सांगलीच्या सलून ने केला आहे. PPE किट घालून सलून मध्ये केस कटिंग सुरू केले आहे. या सलून चालकाची चांगलीच चर्चा सांगलीत रंगली आहे. सांगलीच्या सावरकर कॉलनीमध्ये किरण जाधव यांचे रविज सलून आहे. ते गेल्या सहा वर्षांपासून या ...
Image
अरे देवा! भविष्यात आणखी एक संकट, पुन्हा घरात व्हावं लागणार बंदिस्त कोरोनाव्हायरसचा नाश होऊन आपण कधी घराबाहेर पडतो, याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. मात्र भविष्यात आणखी एक संकट उभं ठाकलंय. नवी दिल्ली, 09 मे :  कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) जगभरातील  लोकांना घरात कैद व्हावं लागलं आहे. हा लॉकडाऊन (lockdown) संपून आपण कधी घराबाहेर पडतो असं प्रत्येकाला झालं आहे. मात्र काही वर्षांनी आणखी एक संकट येणार आहे, ज्यामुळे असंच पुन्हा घरात बंदिस्त व्हावं लागणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, 2060 साली आपल्याला पुन्हा घरात कैद व्हावं लागणार आणि याला कारण कोणता आजार नाही तर भीषण उष्णता (Extreme Heat) असणार आहे. गेल्या काही दशकांत उष्णतेत वाढ होते आहे.  सायन्स अॅडव्हान्स जर्नल मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, 1979 पासून भारत, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, चीन, अमेरिकेत तापमानाचा पारा आणि आर्द्रता वाढण्याच्या अनेक घटना घटल्यात. आतापर्यंत ही समस्या केवळ एक ते दोन तासांपर्यंत मर्यादित होती. मात्र ज्या पद्धतीनं हवामानात बदल होतं आहेत, त्यानुसार ही समस्या जास्त कालाव...

देशात कोरोना रिकव्हरी रेट 30 टक्क्यांजवळ, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

Image
देशात कोरोना रिकव्हरी रेट 30 टक्क्यांजवळ, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही दिलासादायक बाब अशी की, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. नवी दिल्ली, 9 मे:  देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, दुसरीकडे देशात कोरोना विषाणूचा रिकव्हरी दरात वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 30 टक्क्यांजवळ पोहोचले आहे. दिलासादायक बाब अशी की, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3320 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59,662 झाली असून लवकरच ती 60 हजारांचा टप्पा पार करणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 95 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा 1981 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 17,847 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, देशातील प्रत्येक नागरिकाला लॉकडाऊ...